भारतीय ‘प्रजासत्ताक’ महिलांसाठी, दलितांसाठी अजूनही कोसो दूर आहे...
सात दशके लोटल्यानंतरही स्त्रिया आणि दलितांच्या परिस्थितीत बदल घडवून आणण्यामध्ये आपण अपयशी ठरलो आहोत. आंबेडकरांनी भाकीत केले होते की, ‘हिंदू राज्य ही वस्तुस्थिती बनली तर या देशासाठी ही सर्वांत मोठी आपत्ती ठरेल यात शंका नाही.’ जातआधारित भेदभाव आणि पितृसत्ताक पद्धतीच्या वर्चस्वाचे निर्मूलन करण्यासाठी आणि स्त्रियांवर अत्याचार करणारी पितृसत्ता उद्ध्वस्त करण्यासाठी प्रतिज्ञा करण्याची वेळ आली आहे.......